top of page

आईची सावली

बहीण असते,

झालेल्या चुकांतून

सावरून घेते.

आपल्या व्यक्त होण्यातून

आपला व्यक्तिमत्व ठरत असतं,

म्हणूनच आपण कसं वागायचं

ते अधि ठरवायचं असतं.

लक्ष लक्ष दीपांनी

भूमाता सजली,

नववधूचा शृंगार करुनी

ती लाजून चूर झाली.

दिव्याचा प्रकाशाने

अंधार नाहीसा होतो,

अन्न..आपल्या गोड वाणीने

माणूस जोडला जातो.

आपलं  उपयश  
दुसऱ्यावर थोपवू  नये,
अन आल्या गेल्यानं 
खचुन जाऊ नये.

चेहेऱ्यावरच  तेज 
आहारावर अवलंबून असतं,
आणि तेज तर आपल्या 
मनाचा प्रतिबिंब असतं.

मिठासारखं जगणं असावं
पाहिलं तर दिसतं नाही,
आणि नसेल तर 
जेवणच जात नाही.

जेव्हा एक संधी 
हातातून निसटून जाते,
तेव्हा दुसरी संधी ही 
आपलं दार ठोठावत असते.

जेव्हा पायाला
काटा रुततो,
तेव्हाच तर
रास्ता दिसतो.

आपण आपल्या
हातांना मागावा, 
जे मिळाला ते
टिकवून ठेवावं.

माणसानं कसं
वाहत्या पाण्यासारखं असावं,
जे कोणी प्रवाहात येतील 
त्यांना सोबत घेऊन चालावं.

अज्ञानी माणसाला समजावनं
कदापी अवघड नसावं,
मात्र ज्ञानी माणसाला समजावनं
ब्रह्मदेवालाही अवघड जात असावं.

कसे आहात ? या शब्दात 
आपलेपणा दडला आहे,
यातच आपलेपणाचा
ओलावा दडला आहे.

जी व्यक्ती बिनकामी आहे 
तीच खूप दुःखी असते ,
जी व्यक्ती सतत व्यस्त असते 
तिथं दुःख फिरकतही नसते.

जो आजचा 
पराजय पचवतो,
तोच उद्याचा 
विजयी ठरतो.

आपलं जगणं कस
परिससारखं असावं,
सहवासाने एखाद्याचा
आयुष्यच सोनं करावं.​

सुख तो पर्यंत
मिळत नाही,
जो पर्यंत आपण 
समाधान मानत नाही

जिथं विचारांची मांड 
पक्की असते,
तिथं यश 
नक्की मिळते.

ज्यांच्याकडे सर्व काही चांगलं आहे 
ते सुखी नसतात,
मात्र जे आहे त्यात समाधान मानतात 
तेच खरे सुखी असतात.

तलवारीचे घाव सोसणे 
एखादे वेळी सोपे असते,
पण शब्दांचे घाव झेलणे 
खूप अवघड असते.

कोणाचा वाईट बोलण्याने 
वाईट होत नसतं,
आपण जे पेरलंय 
तेच फिरून येत असतं.

राग येतो तेव्हा
संयम बाळगायला हवा, 
या रागातूनच नवा विचार 
उदयाला यायला हवा. 

हाय फाय घर 
नसले तरी चालेल,
मात्र प्रेमाचा एक कोपरा असेल
तर सुख शांती निश्चितच नांदेल

आपल्या अवती भवती
चांगलं वाईट दोन्ही आहे,
यातून काय निवडायचं
आपल्या हातात आहे.

bottom of page