काव्यांगन

माझा गावचं न्यारा
कुठं असेल अथवा नसेल
मात्र इथे आहे
बोलबाला सर्वत्र त्याचाच आहे
तो ... इथला राजा आहे
तव इथे येतो जेंव्हा
नागरी सज्ज असते तेव्ह्न
बागेत उमलावीत फुले जशी
नागरी फुलून निघते तशी
रस्त्याचा गचका बसेल म्हणून
मुरून अंथरला जातो
रोलर त्यावरून फिरविला जातो
अशाने रस्त्याचा पंगच फिटतो
नगरी मात्र दिसते छान
पाहून लोक होतात बेभान
राजाला पाहण्यास गर्दी होते
पदरी मात्र निराशा पडते
राजा येतो , दर्शन देतो
दुसऱ्याच क्षणी निघून जातो
थाट मात्र झक्कास असतो
पार्ट्यांचा हैदोस होतो
राजा फार खुश होतो
सेवकाचा सेवेला भुलतो
राजा , नजराणा बहाल करतो
त्यांचा जीवनाचा उद्धार करतो
आगळी -वेगळी त्यांची माया
आमचा राजाच न्यारा
त्याची किती सांगू किमया
माझा गावचं न्यारा
पाऊस
वटारले डोळे पावसाने
शेतकऱ्यांचे काळीज थरथरले
मशागत झाली, पेरणी झाली
बरसले नाही तरीही नाही
व्याकुळली माने शेतकऱ्यांची
ढग पाहुनी काळे आकाशी
ढग पळवती सुसाट वारे
पुन्हा लक्ख ऊन पडे...
दिवसांमागुन दिवस जाती
नाही टिप्पूस पाण्याचा
काय होणार - कसे होणार
सर्वत्र उडाला हाहाकार