घुसमट

घुसमट

याला जीवन ऐसे नावयाला जीवन ऐसे नाव ...

खाणे पिणे, मजा करणे

स्वतःसाठी इतरांचे बळी घेणे

समाजाशी विलंबित राहणे

याला जीवन ऐसे नाव...

लोकांचा लोभाने गळा कापणे

स्वार्थापोटी लबाडी करणे

तरीही मोठ्या ऐटीत राहणे

याला जीवन ऐसे नाव ...वृक्ष वैभववैभवात पडतसे भर

पाहता क्षणी बहरते मन

महिमा तुझा असे अपार

वर्णावा कैसा पडतो विचार || १ ||

तुझाच कृपेने होतो वृष्टी

उपजते नवीन सृष्टी

पाखरे तयावर विसावती

वातावरण ती संगीतमय कर्ती || २ ||

तरी मानव तुझा नाश कर्ती

छेद करुनि घरे सजावती

यानेच बनला निसर्ग लहिरी

कोपतो आहे सृष्टी वारी || ३ ||

दोष त्यात तुज काय ?

सुरुवात मानवाने आणली हयात

सौंहार तुझा निर्दयी केला

जैसा मातेचा दुग्धोरोज कपिल || ४ ||

निर्मिला वृक्ष संगोपनाचा कैदा ?

पण -- झाला काय याचा फायदा ?

कठोर शासन केलेची पाहिजे

यात सामावले हित मानवाचे || ५ ||पुतळाउभारताय पुतळा

आज कशाला ?

कशाला आणताय

प्रेमाचा उमाळा ?निमित्त पुतळ्याचे

सामोरे करता

फुकट भाव

मारून निघतमागता रोज चंदा

जणू हाच धंदा,

भरून येता गल्ला

मारू पाहता डल्लालोकांची करता

नसती दिशाभूल

गळ्यात मात्र

तुमचा फूलकसाबसा

पुतळा उभारता

शाळातून मात्र

एकदा सजावटएव्हाने असते

पाखरांची वस्ती

डोईवर चालते

त्यांचीच मस्तीथांबवाल का

हि विटंबना ?

जपाल काहो

त्यांचा मूल्यांना ?