देवघर

देवघर

देवघर' देवघर ' चा गाभाऱ्यात,

आहे निरंजन तेवत

भूषण ठरावे ते ' भारत '...!अष्टपैलू व्यक्तिमत्व,

जणू तपस्वी, बोधिसत्व,

अनन्य साधारण जागती महत्व ...!मृदू भाष्य,

स्मित हास्य,

अन्न...दृष्टी कास्य ...!अंगची विनम्रता,

शिस्तीचा भोक्ता,

सदैव जपली मानवता....!एक प्रज्ञावंत,

शिलवंत, विचारवंत,

जसा आधुनिक संत...!सतत व्यस्त,

एकाग्र चित्त,

नांदते इथे विगण्यान अन्न अध्यात्म ...!ज्ञात सर्व,

नच अंगी गर्व,

मनात मात्र ध्यास पर्व...!हा अनमोल ठेवा,

हृदयी जपावा,

जीवनात आदर्श घ्या...!' देवघर ' चा गाभाऱ्यात

आहे निरंजन तेवत,

भूषण ठरावे ते ' भारत '...!