मानस (चारोळीसंग्रह)

मानस (चारोळीसंग्रह)

गरिबांबद्दल कळवळा असणे

माणुसकीची रीत आहे,

त्यांचा परिस्थितीवर हसणे

हे मात्र विकृती आहे.माणूस म्हणून जगण्यात

जीवनाचे सार आहे

जगायचे म्हणून जगण्यात

काय अर्थ आहे.इथं नैवद्य दाखवला जातो

न खात्या देवाला,

दूधपित्या बाळाला मात्र

मुकावं लागतं चमचाभर दुधाला .सासू - सुनेच पटत

असं घर नाही,

भांड्याला भांडं लागत असतं

हा काही शेवट नाही.भावा-भावात जुंपत

प्रकरण विकोपाला जातं

वेळ - काळाला मात्र

रक्ताचं नातं एकचं होतं.