गुड बाय...
घे निरोप जाता जाता
हे लोटणाऱ्या वर्षा
जे काही घडले घडविले
इति: त्याची करून जा
स्वागत आपण करूया आता
नूतन वर्ष येता
करुनी दूर द्वेष मनाचा
विचार करू देश हिताचा
होता एक सारी जनता
तमा कशाची बाळगता
सर्व जमेल सलोख्याने
राहू आपण एकोप्याने
करूया चला कसोटी पुरी
जागे होऊन सत्वरी
देवू तिलांजली मत्सरा
हाच नववर्षाचा संकल्प खरा...!
~~~~~~
कवी डॉ.संजय जमदाडे,लातूर