घटस्थापना..
जशी नवरात्राची
चाहूल लागली,
बायली माझी
कामाला लागली...
धुनी भांडी
धुवून झाली,
अडगळ सारी
साफ करून झाली...
घटस्थापनेचे
वेद लागले,
एकदाचे अश्विन शुद्ध
एक उजाडले...
लोटके, वावरी,
धान आणले,
आंब्याच्या पानांचे
तोरण बांधले...
मांगल्यपूर्ण
वातावरणाने,
घर सारे
प्रफुलित झाले...
आंबा माय
स्थानापन्न झाली,
नवरात्र महोत्सवाला
सुरुवात झाली...
गजबजले घर
माय माझे,
जेव्हा झाले
आगमन तुझे...
लेकरे सारी
सुखावली,
मायच्या पायाशी
विसावली...
दिवसा मागून
दिवस जाई,
नवरात्राची
सांगता होइ...
दसरा सन
आहे मोठा,
आपटा देऊनी
प्रेमाने भेटा...
जाता जाता
एक कर माता,
मनामनात माणुसकीची
ज्योत पाजळू दे आता...
~~~~~
कवी डॉ.संजय जमदाडे,
लातूर - ४१३ ५१२