घे ना उसंत ..
वेध शाळेलाही
देतोस चकवा,
घोर लागतो
बळीराजाच्या जीवा...
तुझ्या आगमनाची
वाट पाहतात,
होताच आगमन
सारेच नटतात...
तुझ्या मुळे
सौंदर्य खुलते,
सृष्टी नवीन
नव्याने उपजते...
आलास तर
असा येतोस,
जीव नकोसा
करून टाकतोस...
अविश्रांत
कोसळलास,
कोसळून
दमलास...
आता वाटतं तू
थोडी उसंत घ्यावी,
हाताशी आला घास
त्याची न व्हावी माती...
~~~~~~
कवी डॉ.संजय जमदाडे,
लातूर ४१३ ५१२