जेव्हा मन बेचैन असते..
जेव्हा मन
बेचैन असते,
तेव्हा तेव्हा
काव्य स्फुरते...
मन जेव्हा
अस्थिर असते,
तेव्हा अपसुकच
व्यक्त होते...
घालमेल मनाची
रुंजी घालते,
मन तेथे
माझे स्थिरावते...
मनातला राग
कवितेने शमतो,
दाबलेला हुंदका
विरून जातो...
कविता माझा
जीव की प्राण,
तिनेच वाढवला
माझा सन्मान...
~~~~~
कवी डॉ. संजय जमदाडे
लातूर - ४१३५१२