झोपडीतला...
इमारतीपुढे पाहून झोपड्या
फिरतात तुमच्या खोपड्या ॥धृ॥
यातच राहतो मानवातला मानव
मनात बाळगा याची जाण
जमत नाही त्यांना शान
असतात राखून आपलं इमान ॥१॥
फाटकं त्यांनी नेसलं असेल
म्हणून नका समजू कंगाल
काकणभर जास्त मोठंच आहे
तुमच्याहून त्यांचंच मन ॥२॥
निवार्याला बसून मिळेल ते खातात
देवाचे गोडवे गात असतात
समाधानी आहेत मने त्यांची
करुणा भाकतात देवाची ॥३॥
~~~~~~~
कवी डॉ.संजय जमदाडे