देवा तुझा मी आभारी...!
देवा तुझा मी आभारी,
जन्म दिला माता-पित्यांच्या उदरी...!
तुझा वरदहस्त शिरावरी,
उनिव कशाची भासेल खरी...!
सारे करतात व्यर्थ चिंता,
वाढवतात सुखी जीवनात गुंता...!
नाही कधीच ब्र शब्द कोणाला,
कशाला कोण येईल वाट्याला...!
मनुष्य जन्म दिलास तू ,
बुद्धीही देणार तू...!
मिथ्या गर्व करू कशाचा,
कर्ता करविता तू विश्वाचा...!
का कोणाच्या हे येत नाही ध्यानी,
उगाच संताप बाळतात मनी...!
मी समाधानाने राहणार आहे,
आदेशाचे तुझ्या पालन करणार आहे...!
नाही माझा रोष कोणावर,
माझा भरवसा आहे तुझ्यावर...!
~~~~~~~~
डॉ.संजय जमदाडे,लातूर