पुतळा...
उभारताय पुतळा
आज कशाला ?
कशाला आणताय
प्रेमाचा उमाळा ?
निमित्त पुतळ्याचे
सामोरे करता
फुकट भाव
मारून निघता
मागता रोज चंदा
जणू हाच धंदा
भरून येता गल्ला
मारू पाहत डल्ला
लोकांची करता
नुसती दिशाभूल
गळ्यात मात्र
तुमच्या फुलं
कसा बसा
पुतळा उभारता
सालातून मात्र
एकदाच सजवता
एव्हाना असते
पाखरांची वस्ती
डोईवर चालते
त्यांचीच मस्ती
थांबवाल का...
ही विटंबना ?
जपाल का हो...
त्यांच्या मूल्यांना ?
~~~~~
कवी डॉ.संजय जमदाडे