भगतसिंह..
तोही एक
लाल होता,
जन्मदात्यांचा
काळीज होता...
बाळकडू
घरातूनच मिळाले,
त्यातूनच ऐसे
पुत्र निपजले...
खेळाच्या वयातच
देश प्रेमाने भारावले,
ब्रिटिशांना
सळो की पळो केले...
गनिमीकाव्याने
कैद केले,
अन् भल्या पहाटे
सुळावर चढवले...
इन्कलाब जिंदाबादने
आसमांत दुमदुमले,
भगतसिंह
अजरामर झाले...
नित्य स्मरण
त्यांचे करावे,
आपणही देशाप्रती
प्रामाणिक व्हावे...
हीच त्यांना
आदरांजली ठरेल,
बलिदान त्यांचे
सार्थकी ठरेल...
~~~~
कवी डॉ.संजय जमदाडे,
लातूर- ४१३५१२