माकडांची शाळा..
एक माकडांची
शाळा होती,
माकडांचीच शाळेत
चालायची मस्ती...
दिवसभर चालायचे
मैदानी खेळ,
सायंकाळी पाचला वाजायची
शाळा भरायची बेल...
सव्वापाचला
वर्गावर यायचे मास्तर,
माकडे ठेवायची
वर काढून दफ्तर...
दिवसभर बागडून
कंटायळाची माकडे,
वाजवून वाजवून
मोडायचे बाकडे...
रोजच वाजायचे
रात्रीचे बारा,
एके दिवशी वाजले
शाळेचेच बारा...
~~~~~
कवी डॉ. संजय जमदाडे
लातूर - ४१३ ५१२