मी जगणार आहे...!
मी जगणार आहे...!
कैक योनीच्या जन्मानंतर,
माणूस जन्म मिळाला आहे,
मिळाले जिवन सार्थ करणार आहे,
म्हणुनच मी जगणार आहे !
नळाला पाणी न येऊ दे,
नाल्या साफ न होऊ दे,
हवेत कितीही प्रदूषण वाढू दे,
रोगराई कितीही पसरू दे,
रस्त्यात खड्डे कितीही पडू दे,
अन्न, धान्य दर वाढू दे,
औषध दर वाढू दे,
पेट्रोल,डिझेल,गॅस, रॉकेल
दर वाढू दे,
भाजी - पाला, कांदा दर वाढू दे,
कर्ज व्याजदर वाढू दे,
मोबाईल बिल वाढू दे,
रेल्वे,बस प्रवास दर वाढू दे,
विज बिल दर वाढू दे,
लेकरांचा शिक्षणाचा खर्च वाढू दे,
सोन्यासाठी, हुंड्यासाठी लेकरांची लग्न मोडू दे, शासनकर्त्यांनी लोकशाही ची लाख वाट लाऊ दे,
मी मतदान करणार आहे... लोकशाहीचे जतन करणार आहे...
मी सर्व सामान्य माणूस कोणताही आततायी पणा न करता,
महागाईने किती ही
कंबरडे मोडले तरी ही
मी जगणार आहे...
खात्या मिठाला जागणार आहे...
मिळाले जीवन सार्थ करणार आहे
आणि म्हणूनच
मी जगणार आहे...
मी जगणार आहे...
मी जगणार आहे...
----‐------------------
कवी डॉ. संजय जमदाडे,
लातूर,महाराष्ट्र