लालपरी..
ऊन, वारा,
पाऊस झेलत,
गाव अन् माणूस
निघते जोडत...
तमा न तिला
दर्या खो-यांचीची,
मात्र काळजी वाहते
साऱ्या प्रवाशांची...
लालपरी ही
जीवन वाहिनी,
जशी मानवी
रक्तवाहिनी...
ज्येष्ठ प्रवासी,
विद्यार्थी अन् पुरस्कारार्थी,
इथे ठरतात
सारेच लाभार्थी...
लालपरी चे
एक बरे असते,
हात केला की
लागलीच थांबते...
वाहक - चालक
मित भाषी,
सलोख्याने वागतात
ते सर्वांशी...
स्वातंत्र्याच्या
अमृत वर्षात,
लालपरी टाकेल
निश्चितच कात...
-×-×-×-×-×-×-
कवी डॉ.संजय जमदाडे
लातूर