विजयादशमी..
विजया दशमी
सण मोठा,
नाही आनंदाचा
मुळीच तोटा...
नवरात्रीचा
जागर करता,
नवचंडीचे
पुजन करता...
नवचंडीचे
ऐका अख्यान,
महिषासुराचा
केले मर्दन...
प्रभू राम चंद्राने
रावणाचा वध केला,
चौदे वर्षाचा
वनवास संपला...
दशमीला हे
सारे घडले,
शमीला महत्त्व
प्राप्त झाले...
शमीलाच म्हणतात
आपटा,
एकमेकाला देऊन
प्रेमाने भेटा...
मोठा सण
आहे दसरा,
क्लेश मनातले
सारे विसरा...
~~~~~
कवी डॉ.संजय जमदाडे
लातूर ४१३ ५१२