वृक्षवैभव...
वैभवात पडत असे भर
पाहतात तक्षणी बहरते मन
महिमा तुझा असे अपार
वर्णावा कैसा पडतो विचार... ॥१॥
तुझ्याच कृपेने होते वृष्टी
उपजते नवीन सृष्टी
पाखरे तयावर विसावती
वातावरण ते संगीतमय करती... ॥२॥
तरी मानव तुझा नाश करती
छेद करूनी घरे सजवती
यानेच बनला निसर्ग लहरी
कोपतो आहे सृष्टी वरी... ॥३॥
दोष त्यात तुझा काय ?
सुरुवात मानवाने आणली हयात
संहार तुझा निर्दयी केला
जैसा मातेचा दुग्धोरोज कापिला... ॥४॥
निर्मिला वृक्ष संगोपनाचा कायदा
पण... झाला काय याचा फायदा ?
कठोर शासन केलेची पाहिजे
यातच सामावले हित मानवाचे... ॥५॥
~~~~~~~
कवी डॉ.संजय जमदाडे