शून्य ..
एक शून्य
सारे ब्रह्मांड,
बाकी सारे
थोतांड...
रित्या हातांनी
आलो आपण,
रित्या हातांनी
जाणार आपण...
भाडोत्री आहे
आपलं शरीर,
इथेच हो
सोडून जाणार...
नकोच फुका
अभिमान,
पण असावा
स्वाभिमान...
ज्याची सोबत
आपण करू,
त्याची किंमत
नक्कीच वधारू...
येताना असलो
जरी शून्य सामान्य,
मात्र जाताना
व्हावे व्यक्ती असामान्य...
~ ~ ~ ~ ~
कवी डॉ.संजय जमदाडे
लातूर