सर्वे सर्वा..
लढण्याचं बळ
दिल तुम्ही...!
जगायचं कसं
शिकवल तुम्ही...!
अन्याय सोसणा-याचं
धारदार शस्त्र तुम्ही...!
जगण्यासाठी धडपडणाऱ्यांचा
श्वास आहात तुम्ही...!
दिन दलीतांचे
सर्वेसर्वा तुम्ही...!
सूर्याची उब अन् उर्मी
दिलीत तुम्ही...!
अनादी काळापासून
तळपणारे सूर्य तुम्ही...!
सर्वसामान्यांचे
जीव की प्राण तुम्ही...!
******
- कवी डॉ.संजय जमदाडे,
लातूर