साठीच्या उंबरठ्यावर..
साठीच्या उंबरठ्यावर
मी खूप खुश आहे,
आता साऱ्या जबाबदारीतून
मी मुक्त झालो आहे...
मुलं शिकली
मोठी झाली,
स्वतःचं बरं वाईट
समजायला लागली...
दोनाचे चार
त्यांचे हात झाले,
आता ते संसारात
रमायला लागले...
त्यांच्या आनंदात
मीही सहभागी आहे,
हेच माझे अस्सीम
भाग्य आहे...
आता तब्येतीची
काळजी घेणं आहे,
उर्वरित आयुष्य
सुखात जगायचं आहे...
नाही चिंता करायची
आता कशाची,
आता जे राहून गेलं
त्याची उणीव भरून काढायची...
कर्तव्यावर असताना
भलतीच अडचण व्हायची,
कोणाला वेळ देण्याची
मुभाच नसायची...
आता सर्वच मुक्त
अन स्वच्छंद आहे,
खांद्यावर आता
कुठे ओझं आहे...
मन आता
नातवंडात रमतं,
हेच तर परिपूर्ण
जगणं असतं...
आवडीच्या क्षेत्राला
वेळ द्यायचं,
मिळाली संधीच तर
सोनं करायचं...
आता मन थोडं
मोठं करायचं,
एवढ्या तेवढ्यात
नाही गुंतायचं...
इतके दिवस
सर्वांनाच जपलं,
आता मात्र
स्वतःला जपायचं...
इतके दिवस केली
खूप बारीकी,
आता माञ दाखवायची
दिलदारकी...
असं मस्त जगायचं
ओझं कोणाला व्हायचं नाही,
कोणी आधार मागितलाच तर
माग पुढं पाहायचं नाही...
वय कसं वाढतच असतं
निसर्ग कधी थांबलाय का ?
आला दिवस जाण्या वाचून
कधी राहिलाय का ?
उगवला सूर्य
अस्ताला जाणार आहे,
हा श्वास ही एक दिवस
थांबणार आहे...
~~~~~~
कवी डॉ.संजय जमदाडे
लातूर