स्वप्न..
साखर झोपेतलं स्वप्नही
हल्ली फोल लागलं ठरायला,
सांगा दोष काय त्याचा ?
दर्जाही लागला ढळायला...
साखर झोपेतलं स्वप्न
पूर्वी उतरायचं सत्यात,
आता ते स्वप्नच
दिवा स्वप्न ठरू लागलीत...
काळाच्या ओघात माणूस
किती बदलून गेला,
तसा निसर्ग नियम ही
कुरुकोडी करू लागला...
कलयुगातल्या माणसानं
एकूणच वर्तन बदललं,
सरड्याला ही ते
लाजवायला लागलं...
~~~~~~~
कवी डॉ.संजय जमदाडे,लातूर