काजळ..
बाई मी
काजळ लावते,
माझ्या बाळाची
काळजी वाहते...!
बाळाला माझ्या
टिक लावते,
दृष्ट लागण्यापासून
बचाव करते...!
बाळ माझं
आहे नवसाचं,
नजर रोखून
पाहू नकोस उगाचं...!
बाळ माझं
आहे नाजूक,
आम्हां दोघांच्या
प्रेमाचं प्रतीक...!
बाळ माझं
खुदकन हसत,
क्षणात साऱ्यांना
आपलंसं करतं...!
बाळ माझं
आरशात पाहतं,
स्वतःला पाहून
खुदकन हसतं...!
कोरलेल काजळ
बाळाला शोभतं,
सौंदर्य त्याचं
अधिकच खुलवतं...!
~~~~~
कवी डॉ.संजय जमदाडे,
लातूर